Heavy rains in Kalamb taluka, one died and two survived due to being swept away
कळंब, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात शनिवारी रात्री बारा वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपर्यंत तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. शेतात गेलेले शेतकरी शेतातच अडकले, तर पाडोळी येथील शेतकरी विजय जोशी यांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला, तर इटकूर येथील वाशिरा नदीवरून दोन शेतकरी वाहून जात असताना बालंबाल बचावले आहेत.
तालुक्यातील भोगजी, आढाळा, पिंपळगाव को. आदी गावांत अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले व इटकूर येथून पुढील गंभीरवाडी व इतर गावे खामसवाडी, वडगाव शि., निपाणी, संजितपूर, बाभळगाव, दहीफळ या गावांचाही संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरल्याने गावागावांत हाहाकार उडाला आहे. शेतातील वीस टक्के उत्पन्न हातात येईल, अशी शेतकरयांना अपेक्षा होती, पण ती आता मावळली आहे. शेतकरी आता फक्त शासनाकडून येणास्या मदतीवरच अवलंबून असून, शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. काही गावांत तलाठी हे शेतकस्यांना नियमावर बोट दाखवून अव-हेलना करत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
तात्काळ मदत द्या तालुक्यातील शेतकस्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले असून, आता सर्वच पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आता उपजीविका कशी करायची, हा शेतकस्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने कसलेही पंचनामे न करिता सातबारावरील नावानुसार मदत तात्काळ द्यावी.सुरेश गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
नांदेड : उमरी, नायगाव, मुखेड तालुक्यात रविवारी (दि.५) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पुरामुळे विद्युत खांबे पडल्याने काही गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नायगाव तालुक्यातही विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली.