अठरा लाखांचा गुटखा जप्त; धाराशिव येथून एकास अटक File Photo
धाराशिव

Gutkha Seizure : अठरा लाखांचा गुटखा जप्त; धाराशिव येथून एकास अटक

शहरातील शम्स चौक परिसरात प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करून दुसऱ्या वाहनात माल उतरविण्याचा प्रकार उघडकीस आला.

पुढारी वृत्तसेवा

Gutkha worth ₹18 lakh seized; one arrested from Dharashiv

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शम्स चौक परिसरात प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करून दुसऱ्या वाहनात माल उतरविण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी छापा टाकून १७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सलमान गुलाम शेख (रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे. परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकासह गाझी स्कूलजवळ छापा टाकला. त्यावेळी आरोपी टोयोटा इनोव्हा (एमएच २४ व्ही १६४२) मधून प्रतिबंधित गुटख्याच्या गोण्या मालवाहतूक पिकअप (एमएच १२ एसएफ ४०७०) मध्ये उतरवत असताना रंगेहात पकडण्यात आला.

कारवाईदरम्यान विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला, चघळण्याचा तंबाखू आदी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध बँडचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच दोन्ही चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १७ लाख ८२ हजार २९७ रुपये आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT