धाराशिव

Good News For Farmers : पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा

डीपीसीच्या बैठकीत ठराव : आ. पाटील

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान अभुतपूर्व आहे. त्यामुळे पीकविमा भरलेला नसलेल्यांपैकी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळायला हवा, असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मंजूर झाला आहे. तो आता राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण ७३३ गावांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात धाराशिव तालुक्यातील सर्वाधिक १२५ गावांचे त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील १२२, भूम,

परंडा आणि उमरगा तालुक्यातील ९६, लोहारा तालुक्यातील ४७, कळंब तालुक्यात ९७ तर वाशी तालुक्यातील बाधित गावांची संख्या ५४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकरी बांधवांच्या वाट्याला या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान आले आहे. जिल्ह्यात पाच लाख ३४ हजार ३८२ हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच लाख ५४३२ हेक्टर जिराईत, २२ हजार ६११ हेक्टर बागायत तर सहा हजार ६३९ हेक्टर क्षेत्र फळपिकांचे आहे. बाधित असलेल्या संपूर्ण क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण नुकसानीची तीव्रता अभूतपूर्व अशीच आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ६८३ विहिरी खचल्या असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT