धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री पदाचा विषय दोन दिवसांत सुटेल. हे पद मिळावे, असे साकडे मी देवीला घातले आहे. देवी नक्की ते पूर्ण करेल, असे सांगत रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांची आपली इच्छा पुन्हा बोलून दाखवली.
ना. गोगावले शुक्रवारी (दि. 14) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना रायगडच्या पालकमंत्री पदाची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली. ते म्हणाले, की रायगड जिल्ह्यातील मतदार व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, की रायगडचे पालकमंत्रीपद मलाच मिळावे. त्यामुळे तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यासाठीच मी आज तुळजापुरात आलो आहे. मला खात्री आहे, की रायगडचे पालकमंत्रीपद मलाच मिळेल.
‘ऑपरेशन टायगर’बाबत ते म्हणाले, की जे जे पक्षात येऊ इच्छितात त्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्याची जबाबदारी माझ्यावरही आहे. उध्दव ठाकरे शिवसेनेतील खासदारांवर त्या पक्षाचे नेते अविश्वास दाखवत आहेत. वास्तविक त्यांनी विश्वास ठेवायला हवा. असेही त्यांनी बोलून दाखविले.