Washi record clerk arrest
वाशी : वाशी शहरातील अभिलेख कार्यालयातील आवक जावक लिपीकाने तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या गट नं. ४४४ मोजणी केलेल्या शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी तीन हजाराच्या लाचेची मागणी केली. दि. २७ मे रोजी तडजोडीअंती दोन हजार रुपयाची रोख लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडून त्याच्यावर कारवाई केली आहे.
तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या गट नं. ४४४ मधील मोजणी केलेल्शेया शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी वाशी येथील उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यातील लोकसेवक आवक जावक लिपीक दिगंबर मारुती ढोले, वय ४५ वर्षे, रा. गणेश मेडिकलच्या समोर, दत्तात्रय राऊत यांच्या घरी भाडेत्तवावर, तालुका वाशी, जिल्हा धाराशीव. मुळ गाव रा. हदगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी यांनी तीन हजार रूपयाची लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोन हजार रूपये घेवून येण्यास सांगितले.
यानंतर (दि. २७ मे ) रोजी दोन हजार रूपयाची पंचासमक्ष लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडून त्याच्याजवळील लाचेची दोन हजार रूपयाची रक्कम व ओपो कंपनीचा मोबाईल जप्त केला. त्याच्याविरोधात पोलीस ठाणे वाशी जि. धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन आरोपीस अटक करून पुढील तपास करण्याची प्रक्रिया सूरू आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- १०६४ पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर ९९२३०२३३६१ व पोलीस उपअधीक्षक ९५९४६५८६८६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.