Dharashiv news 
धाराशिव

Dharashiv news: शासकीय सिधा गोदाम मालावर चोरट्यांचा डल्ला; ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे टळली मोठी लूट

Dharashiv theft news: केवळ १५ ते २० पोती ज्वारी चोरट्यांच्या हाती लागल्याचे देखील समोर आले आहे

पुढारी वृत्तसेवा

भूम: पार्डी घाट परिसरात गुरुवारी (दि. ११) रात्री ११ ते ११:२० वाजण्याच्या दरम्यान ज्वारी घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकवर (क्र. एमएच १८ बीजी ४७३७) अज्ञात चोरट्यांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र ड्रायव्हरच्या चातुर्यामुळे मोठी लूट टळली असून, केवळ १५ ते २० पोती ज्वारी चोरट्यांच्या हाती लागली.

घटनेचा तपशील असा की, बुलढाणा येथून भूमकडे निघालेली ट्रक गाडी पार्डी घाटामध्ये आल्यानंतर काही चोरट्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाडीवर उडी मारत ताडपत्री धारदार शस्त्राने कापून माल लुटण्याचा प्रयत्न केला. गोंधळात काही पोती चोरीस गेली असली तरी चालकाने तत्परता दाखवत उर्वरित माल वाचवला. "ड्रायव्हरच्या माहितीनुसार, चोरटे काळ्या कपड्यांत होते व अंधाराचा फायदा घेत त्यांनी पोती बाहेर काढली."

परिसरात भीतीचे वातावरण

विशेष म्हणजे, याच ठिकाणी मागील आठवड्यात तूरडाळ वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. सलग दोन महिन्यांत अशा घटना घडल्याने पार्डी घाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना वाढत असून, पार्डी घाटात रात्री अशा घटनांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह

पार्डी घाट भागात रात्री अकरा वाजता पोलिसांची गस्त असते. तरीदेखील या घटनेनंतर पोलिस गस्त पुरेशी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांनी रात्री १० नंतर पोलिस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT