Paranda Tehsildar Threat Case Pudhari
धाराशिव

Paranda Tehsildar Threat | परंडा येथे तहसिलदारांना धमकी; महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

तहसिलदार निलेश काकडे यांना शासकीय कामावर जात असताना अडवून धमकावल्याची घटना

पुढारी वृत्तसेवा

Paranda Tehsildar Threat Case

परंडा: परंडा येथील तहसिलदार निलेश काकडे यांना शासकीय कामावर जात असताना अडवून धमकावल्याची घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसिलदार निलेश काकडे हे सायंकाळी सुमारे ६:३५ वाजता अवैध वाळू उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी जात असताना योगेश मेटकरी व त्याच्या सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच त्यांची शासकीय गाडी अडवली.

यावेळी आरोपींनी आरडाओरडा, शिवीगाळ करत दहशत निर्माण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तहसिलदारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी वाद घालत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर रात्री उशिरा परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ तहसील कर्मचाऱ्यांनी १६ एप्रिल रोजी धाराशिव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. आरोपींवर एमपीडीए कायद्यांतर्गत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर १६ एप्रिलरोजी महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. तसेच आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास २० एप्रिलपासून बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT