Dharashiv News : पालिका कर्मचाऱ्याच्या निषेधार्थ परंडा शहर बंद file photo
धाराशिव

Dharashiv News : पालिका कर्मचाऱ्याच्या निषेधार्थ परंडा शहर बंद

निलंबित करण्याची मुस्लिम समाजाची मागणी; कारवाई न झाल्यास करणार तीव्र आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: Paranda Town Shuts Down in Protest Against Municipal Employee

परंडा, पुढारी वृत्तसेवा नगर परिषद कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने जातीवाचक अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ९ मे) परंडा शहर बंद ठेवण्यात आले. या बंदला शहरातील व्यापारी, मुस्लिम समाज व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील मुख्य बाजारपेठ, मंडई पेठ, टिपू सुलतान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महार-ाणा प्रताप चौक तसेच महात्मा फुले चौक परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. समस्त मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच योग्य कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, २६ एप्रिल रोजी परंडा शहरातील नागरिक निसार मुजावर यांनी शहरात दोन-तीन दिवसांपासून कचरा घंटागाडी आली नसल्याबाबत मोबाईलवरून विचारणा केली होती. त्यावेळी नगर परिषद कर्मचार्यान अश्लील भाषेत बोलून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे नागरिकांनी सांगितले. परंडा हे सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदणारे शांतताप्रिय शहर असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी जाती-धर्मावरून अपमानास्पद भाषा वापरणे ही गंभीर बाब असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले.

या प्रकरणी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही निलंबनाची अथवा कठोर कारवाई न झाल्याने मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परंडा शहर बंद ठेवण्यात आले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT