Indian Railways file photo
धाराशिव

Dharashiv News : पंढरपूर - शेगाव रेल्वेसाठी 'डीआरएम'कडे पाठपुरावा

रेल्वे भवनात सविस्तर चर्चा, भूम, परंडा, वाशी तालुक्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News : Follow up to 'DRM' for Pandharpur - Shegaon Railway

भूम, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर-शेगाव या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या मागणीला गती देण्यासाठी पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे भवनात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांची भेट घेऊन या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मार्गामुळे भूम, परंडा, वाशी यांसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार असल्याने प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पंढरपूर-शेगाव रेल्वे अस्तित्वात आल्यास धार्मिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक शहरांना थेट रेल्वे संपर्क मिळू शकतो. त्यामुळे प्रवासी मार्ग वाहतुकीसोबतच शेतमालाची बाजारपेठांपर्यंत वाहतूक, उद्योग-व्यवसायाची वाढ, रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग ठरू शकतो, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या रेल्वे मार्गासाठी केंटीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार विशाल पाटील तसेच मेघा कुलकर्णी यांना यापूर्वी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे. यावेळी बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह भूम, परंडा, वाशी परिसरातील गोरख भोरे, तानाजी पाटील, संतोष वरळे, बागल सर, संकेत बागल तसेच इतर मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT