Dharashiv News : जोगव्याच्या परडीत फुले अन् क्यूआर कोडद्वारे पैसे ! file photo
धाराशिव

Dharashiv News : जोगव्याच्या परडीत फुले अन् क्यूआर कोडद्वारे पैसे !

येरमाळा : यात्रेत पारंपरिक जोगव्याला डिजिटल व्यवहाराची जोड

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: Flowers payments QR code jogva

बाळासाहेब जाधवर

रत्नापूर : देवीचा जोगवा मागण्याची परंपरा जुनी; मात्र, काळानुसार त्याच्या व्यवहाराची पद्धतही बदलू लागली आहे. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत जोगवा घेणाऱ्या महिलांच्या हाती आता मोबाईलद्वारे पैसे स्वीकारण्यासाठीचे क्यूआर कोड दिसू लागले आहेत. समोर फुलांनी सजवलेली परडी, पूजेचे साहित्य आणि हातात डिजिटल व्यवहाराचा पर्याय, असे हे अनोखे दृश्य यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेत आहे.

येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा मोठा सोहळा. देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक येतात. नवस, पूजा-अर्चा आणि दानधर्मातून श्रद्धा व्यक्त केली जाते. याच यात्रेत जोगवा मागणाऱ्या महिलेने पैसे स्वीकारण्यासाठी मोबाईलवरील व्यवहाराचा पर्याय उपलब्ध करून दिल्याचे चित्र समोर आले आहे.

पूर्वी जोगवा किंवा दक्षिणा देण्यासाठी रोख रक्कम जवळ असणे आवश्यक होते. मात्र, आता खिशात पैसे नसले तरी भ्रमणध्वनीद्वारे पैस पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाल आहे. त्यामुळे पारंपरिक जोगव्यालाह आधुनिक व्यवहारपद्धतीची जोड मिळाल्याचे दिसते.

परंपरा तीच, व्यवहाराची पद्धत नवी !

डिजिटल व्यवहारांचा वापर आता मोठी दुकाने किंवा व्यावसायिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. चहाच्या टपरीपासून भाजीविक्रेत्यांपर्यंत अनेक ठिकाणी धनादेश संकेतांकाद्वारे पैसे स्वीकारले जातात. आता धार्मिक यात्रेतील जोगव्याच्या व्यवहारातही या तंत्रज्ञानाची उपस्थिती जाणवू लागली आहे. संबंधित महिलेने ही पद्धत कधीपासून सुरू केली आणि भाविकांकडून तिला किती प्रतिसाद मिळतो, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, श्रद्धेची परंपरा कायम ठेवत व्यवहाराचे माध्यम बदलत असल्याचे हे चित्र लक्षवेधी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT