Dharashiv News : तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याने परत केली पाच हजारांची दुष्काळी मदत file photo
धाराशिव

Dharashiv News : तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याने परत केली पाच हजारांची दुष्काळी मदत

शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत तुळजापूर तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ सुरवसे यांनी शासनाला साभार परत केली.

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: Farmer in Tuljapur taluka returns drought relief aid of five thousand rupees

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत तुळजापूर तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ सुरवसे यांनी शासनाला साभार परत केली. तुळजापूर तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या प्रतिनिधीकडे लेखी निवेदनासह ही रक्कम परत करण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा गोपाळ सुरवसे यांचे पती गोपाळ सुरवसे यांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगितले. या रकमेतून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होणे शक्य नाही. त्यामुळे 'ही रक्कम तुम्हीच ठेवा आणि याच पैशातून दिवाळी साजरी करा,' असा संदेश देत त्यांनी मदत परत केली.

गोपाळ सुरवसे हे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी असून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत डीपी मिळवून देणे, गरजू एकल महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देणे, युवकांना क्रीडा साहित्य देणे तसेच शेतमजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत भरीव मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने केवळ पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांची निराशा केली आहे, अशी प्रतिक्रिया सुरवसे यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी, हरीश जाधव, सुरेश कोकरे, ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT