कळंब–लातूर महामार्गावर ‘हिट अँड रन’  Pudhari
धाराशिव

Dharashiv Accident | कळंब - लातूर महामार्गावर ऊसतोड मजुरांना उडविले; ७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

Kalamb Latur highway accident

कळंब : कळंब–लातूर महामार्गावर ‘हिट अँड रन’ प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या ७ ऊसतोड मजुरांना उडवले. या भीषण अपघातात ४ मजुरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघातात जखमी झालेले सर्व मजूर कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे रहिवासी असून ते आदिवासी पारधी समाजातील आहेत. दिवसभर ऊस तोडीचे कष्ट उपसून हे मजूर आठवडी बाजारासाठी कळंबकडे येत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. कळंब–लातूर रस्त्यावरून आलेल्या एका भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, मजूर रस्त्यावर दूरवर फेकले गेले. मात्र, माणुसकी विसरलेला चालक मदतीला थांबण्याऐवजी वाहनासह पसार झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने कळंब उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चौघांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लातूर पासिंगच्या वाहनाचा संशयअपघातग्रस्त वाहनावर लातूर जिल्ह्याचे पासिंग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चालक लातूर जिल्ह्यातीलच असावा, असा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या आप्तस्वकीयांची अवस्था पाहून रुग्णालयात आक्रोश झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू केला असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT