theft  File Photo
धाराशिव

Cattle Theft Dharashiv | शेतातील गोठ्यातून म्हैस आणि दोन रेड्या चोरीला; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

पानगाव येथील घटना; येरमाळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Buffalo Stolen Kalamb

रत्नापूर : कळंब तालुक्यातील पानगाव येथे शेतातील गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि दोन रेड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या जनावरांची एकूण किंमत एक लाख १५ हजार रुपये असून, या चोरीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पानगाव येथील गणेश विश्वनाथ बेडके (वय ४१) यांचा गट क्रमांक ३०/अ मध्ये शेत आहे. या शेतातील गोठ्यात त्यांनी एक म्हैस आणि दोन रेड्या बांधल्या होत्या. ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातील तिन्ही जनावरे चोरून नेली.

सकाळी गोठ्यात जनावरे दिसून न आल्याने बेडके यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, जनावरांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून १ नोव्हेंबर २०२६ रोजी येरमाळा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शेतातील गोठ्यातून जनावरे चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT