उमरगा : शहरात विविध भागांत उभ्या असलेल्या पवनचक्की आणि सौरऊर्जा प्रकल्पांशी संबंधित तब्बल १४ वाहनांच्या काचा बॅट व दांडक्याने फोडून अज्ञात व्यक्तींनी बुधवारी, (दि २५) साडे अकराच्या सुमारास अक्षरशः धुडगूस घातला. यात वाहनाचे मोठे नुकसान असून रात्रीच्या अंधारात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यांत पवनचक्की आणि सौर ऊर्जेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कंपन्यांशी संबंधित कार्यालय, अधिकारी व कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील ऐश्वर्या हाईट, साईधाम काॅलनी तसेच जकेकूर चौरस्ता परिसरातील ब्लू डायमंड हाँटेल जवळ जे. एस. डब्ल्यू. रिन्यू ८, आवादा ऊर्जा ४ आणि सुयोग ऊर्जा लिमिटेड २ अशा उभ्या करण्यात आलेल्या १४ वाहनांच्या काचा बॅट व दांडक्याने अज्ञातांनी तोडफोड केली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गुरवारी दुपारी पोलीस अधीक्षक रितु खोकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
तोडफोडी मागील सूत्रधार कोण?
शहरात चार ठिकाणी एकाच वेळी घडलेल्या वाहन तोडफोडीने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मात्र, या सुनियोजित वाटणाऱ्या तोडफोडी मागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. हा प्रकार कोणी खंडणी किंवा अन्य कोणत्या उद्देशाने घडविला, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
तक्रारदार पुढे येईना; गूढ वाढले!
१४ वाहनांची तोडफोड होऊनही संबंधित कंपन्यांचे अधिकारी अथवा अन्य कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे या घटनेमागील गूढ अधिकच वाढले असून, चर्चांना उधाण आले आ