उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे.  File Photo
धाराशिव

Eknath Shinde : ‘मी बिन टाक्याचेही ऑपरेशन करतो..!’ : उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला

पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात साधला निशाणा

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : मी शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतीची आवड आहे. अगदी सफरचंद पिकविण्यापर्यंतचे प्रयोग मी शेतीत करत असतो. मात्र मी गावी गेलो की अनेकांच्या पोटात दुखते. आता लवकरच या पोटदुखीवर इलाज करणारेही झाड लावणार आहे, असे सांगत मी डॉक्टर नसलो तरी अनेक आजारांवरील शस्त्रक्रिया सहज करतो, हे अनेकांनी पाहिले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात रविवारी ते बोलत होते. नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. पालकमंत्री प्रताप सरनाईक अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलतानाही विरोधकांवर टीकेची झोड उठवली.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही.मात्र सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी अहोरात्र झटत असतो. पायाला भिंगरी लावून फिरत असतो. मी शेतकरी असल्याने माझ्या गावच्या शेतात माझे पाय वळतात. मी तिकडे गेलो की अनेकांच्या पोटात दुखते. लवकरच अशा पोटदुखीवर इलाज केला जाईल, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT