Dharashiv News : भूजल व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक : जिल्हाधिकारी पुजार file photo
धाराशिव

Dharashiv News : भूजल व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक : जिल्हाधिकारी पुजार

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय भूजल विभागाच्या भूजल माहिती भांडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

Coordination of all agencies is necessary for groundwater management: District Collector Pujar

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातूनच प्रभावीपणे राबविले गेले पाहिजे. केंद्रीय भूजल विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या डेटाबेसचा समन्वित आणि व्यापक वापर केल्यास जिल्हास्तरीय नियोजन अधिक परिणामकारक होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय भूजल विभाग, पुणे यांच्या वतीने शासकीय कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मौल्यवान माहितीचा स्थानिक भूजल व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज केंद्रीय भूजल विभागाच्या भूजल माहिती भांडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. मैनाक घोष यांनी भूजलविषयक विश्वासार्ह व अद्ययावत माहितीचा ग्रामस्तरीय जलसुरक्षा योजना तयार करताना प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तर वरिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ. उपेंद्र धोंडे यांनी राष्ट्रीय जलधर नकाशाकरण व डेटा पोर्टल प्रणालींच्या उपयोगावर तांत्रिक सादरीकरण केले. या प्रसंगी कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा या कॉफी टेवल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेला विविध विभागांचे एकूण ५५ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. आभार श्रीमती व्ही. हेमलता यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT