Omraje Nimbalkar उबाठा गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे घरीच उपस्थित होते त्याच्या समोरच हा प्रकार घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि रूपांतर थेट हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान वाद झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तत्काळ मध्यस्ती करत मिटविला वाद असून वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.