तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने कला रायप्पा व त्यांच्या कन्या रिशिका यांचा सत्कार करण्यात आला. pudhari photo
धाराशिव

तुळजाभवानी देवीच्या चरणी सव्वा ९ लाख रुपयांची रोख देणगी अर्पण

Tuljabhavani temple: कर्नाटकातील बेंगलोरच्या 'कला रायप्पा' यांनी दिली देणगी

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला सोन्याचे अलंकार आणि रोख रक्कम अर्पण करण्यासाठी मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी बेंगलोरच्या एका भाविकाने नऊ लाख रुपये रोख रक्कम तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केली आहे.

कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील रहिवाशी असणाऱ्या कला रायप्पा यांनी श्री. तुळजाभवानी देवीला सव्वा ९ लाख रुपयांची रोख देणगी दिली. श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा व त्यांच्या कन्या रिशिका यांचा महावस्त्र व श्री. तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, नागेश शितोळे, गणेश निर्वळ, अक्षय साळुंके, असिफ डांगे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT