Dharashiv News : सणासुदीच्या काळात जुगार क्लबचा श्रीगणेशा; अवैध धंद्यांचा बाजार तेजीत  File Photo
धाराशिव

Dharashiv News : सणासुदीच्या काळात जुगार क्लबचा श्रीगणेशा; अवैध धंद्यांचा बाजार तेजीत

उमरगा शहरासह तालुक्यातील चित्र, हवी कठोर कारवाई; विशिष्ट कर्मचाऱ्यांकडून 'वसुलीची' चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Cards, gambling, matka and other illegal businesses are going on in the taluka Umarga

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात तीन महिन्यांपासून बंद असलेले अवैध धंद्यांचा गणेशोत्सवात पत्ते, जुगाराचा श्रीगणेशा झाला आहे. सणासुदीच्या काळात याचा अक्षरशः बाजार भरला आहे. हे सर्व धंदे बंद करण्याची मागणी होत आहे. तालुक्यात पत्ते, जुगार, मटका व इतर अवैध व्यवसायातून गुन्हेगारी घटना घडल्या आहेत.

याच्या विरोधात लोकप्रतिनिधी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी याला चांगलाच आळा घातला होता. पोलिस निरीक्षक बदलून जाताच बंद असलेले अवैध धंदे आणि जुगाऱ्यांनी आपले 'अड्डे' खुले आम सुरू केले आहेत. यापूर्वी कधी नव्हे एवढा पत्ते, जुगाराचा बाजाराच जणू 'फुलला' आहे. एकीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कारवाई करण्याचा 'आव' पोलिसांकडून केला जातो.

प्रत्यक्षात मात्र, चित्र अगदी वेगळे आहे. या अड्ड्यांवर 'खान-पान' सह जुगार शौकिनांची 'मर्जी' पुरविली जाते. 'व्हाईट कॉलर्ड' म्हणून समाजात वावरणारे याचे अप्रत्यक्ष भागीदार तसेच पोलिसांसोबत 'उठबस' असणाऱ्या महाभागांनी बक्कळ पैसा कमविण्याच्या हेतूने या अवैध धंद्यांना जण 'चालना' दिली तर नसेल असा प्रश्न उपस्थित करून लाखोंची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. राजकीय पाठबळ तसेच पोलिस दप्तरी शिरावर गंभीर गुन्हयांची नोंद असलेल्यांनी या अवैध व्यवसायात पाय रोवले' आहेत. 'रम-रमी' असे एकूणच वलय असणाऱ्या या जुगाराला सणासुदीच्या दिवसांत जणू हिरवी झेंडी मिळाली आहे.

पोलिस ठाण्यातील कार्यकाळ संपला तरी राजकीय वजन वापरून बरेच पोलिस कर्मचारी चांगले ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या अनेकांच्या ओळखी झाल्या आहेत. यातील विशिष्ट कर्मचाऱ्यांची वसुलीची उलाढाल ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे. हे कर्मचारी ठाणेद राराच्या भूमिकेत वावरत आहेत. तर अन्य कार्यरत अधिकारी, कर्मचारीही फारसे काम करण्यात 'इंटरेस्टेड' नसल्याचे बोलले जात आहे. एसपींनी अशा कर्मचाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकप्रतिनिधींचे 'मौन' आश्चर्यकारक !

पोलिस एरव्ही चुटपूट कारवाई करून सजग असल्याचे आवर्जून दाखविल्या जाते. परंतु पत्ते, जुगाराबाबत पोलिसांची चुप्पी तसेच लोकप्रतिनिधी देखील याबाबत 'मौन' पत्करून असल्याने काही 'मौनीबाबा' यामध्ये हिस्सेकरी तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करून सत्यता तपासणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT