Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र भाजप, शिवसेनेची घोडदौड File Photo
धाराशिव

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र भाजप, शिवसेनेची घोडदौड

राष्ट्रवादी काँगेस निष्प्रभ; महाविकास आघाडीला मर्यादीत यश

पुढारी वृत्तसेवा

BJP and Shiv Sena have won everywhere in Dharashiv district.

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : पालिका निवडणुकीत जिल्ह्यात भाजप, शिवसेनेने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळविले असून अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र निष्प्रभ ठरली आहे. महाविकास आघाडीला मर्यादीत यश मिळाले असून 'आघाडी' न झाल्याचा फटका त्यांना बसला आहे. ठाकरे शिवसेनेचीही या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे.

जिल्ह्यातील धाराशिव, नळदुर्ग, तुळजापूर व मुरुम येथे भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले असून अनुक्रमे नेहा काकडे, बसवराज धरणे, विनोद गंगणे आणि बापूराव पाटील यांनी कमळाच्या चिन्हावर पक्षाला पहिल्यांदाच यश मिळवून दिले आहे. तर कळंब येथे शिवसेना-भाजपच्या सुनंदा कापसे, उमरगा येथे शिंदे शिवसेना व काँग्रेस आघाडीचे किरण गायकवाड, परंडा येथे शिंदे शिवसेनेचे जाकीर सौदागर निसटत्या मतांनी विजयी झाले.

सौदागर यांच्या विरोधात भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना या पक्षांची शहर विकास आघाडी होती. येथे पालिकेत सर्वाधिक नगरसेवक शहर विकास आघाडीचे निवडून आले असून भूम येथे मात्र शहर विकास आघाडी व शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांत कांटे की टक्कर झाली. येथेही शिंदे शिवसेनेचे संयोगिता गाढवे याही निसटत्या मतांनी विजयी झाल्या.

नगरसेवकांची संख्या मात्र जनशक्ती नगर विकास आघाडीकडे अधिक आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्य येते भाजपने मागील पाच वर्षांत खेचून घेतले होते. त्याचा फायदा भाजपला मिळाला आहे. आजपर्यंत एकही भाजपचा नगराध्यक्ष किंबहुना दोन आकडी नगर-सेवक पदांपासूनही दर असलेल्या या पक्षाला आयात नेत्यांमुळे बंपर लॉटरी लागली आहे. मुरुमचे बसवराज पाटील काँग्रेस सोडून भाजपत आले. परिणामी मुरुम पालिका भाजपला मिळाली.

आ. राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीतून भाजपत आल्यामुळे तुळजापूर, नळदुर्ग तसेच धाराशिव शहरात आणि कळंबमध्ये भाजपला फायदा झाल्याचे निकालावरुन दिसत आहे. तर महाविकास आघाडीला आघाडी म्हणून एकत्र ठेवण्यात नेत्यांना अपयश आले. त्याचा मोठा बसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT