चार विधानसभा मतदारसंघांत १४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क : डॉ. ओंबासे  pudhari photo
धाराशिव

चार विधानसभा मतदारसंघांत १४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क : डॉ. ओंबासे

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. हा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात आजपासून लागू झाली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण १४ लक्ष २ हजार ३२५ मतदार मतदानाचा हक बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ऑचासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथके तात्काळ गठीत करण्यात येत आहे, असे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले की, विधानसभा मतदारसंघनिहाव निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर एक खिडकी योजनेतून उमेदवारांच्या प्रचरविषयक बाबींना मंजुरी व परवानगी देण्यात येणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत ७० टक्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी डॉ. ओंबासे यांनी केले. निवडणुकीसाठी लागणाऱ्या आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन केले आहे असे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले, मतदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत मतदार महणून नावनोंदणी करता येईल. विविध अॅपचा उपयोग निवडणूक यंत्रणांना आणि उमेदवारांना

निवडणुकीविषयक कामासाठी करता येणार आहे. जिल्ह्यात ६ क्रिटिकल मतदान केंद्र आहे. मतदारांना त्यांचे कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे याची माहिती अस लेली चिट्ठी (स्लिप) ही मतदानाच्या ३ ते ४ दिवस अगोदर मतदाराला देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. ओंबासे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात २८८ विधानसभा मतदान संघासाठी एकाच दिवशी म्हणजे बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असल्याचे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले, जिल्हयातील २४० उमरगा (अनुसूचित जाती राखीव), २४१-तुळजा पूर, २४२-उस्मानाबाद आणि २४३-परंडा या विधानसभा मतदारसंघात याच दिवशी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याचे सांगून डॉ ओंबासे म्हणाले, यामध्ये उमरगा ३२९, तुळजापूर ४१०, उस्मानाबाद ४१६ आणि परंडा ३७६ मतदान केंद्राचा समावेश आहे.

उमरगा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ६५ हजार ७७४ पुरुष, १ लक्ष ४८ हजार ९०६ रखी, ९ तृतीयपंथी आणि भारतीय सैन्य दलात जिल्ह्यातील कार्यरत असलेले ६७४ मतदार असे एकूण ३ लक्ष १५ हजार ३३३ मतदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २ लक्ष ५५४ पुरुष, १ लक्ष ८१ हजार २९० खी, ७ तृतीयपंथी व भारतीय सैन्यतील ६१६ मतदार असे एकूण ३ लक्ष ८२ हजार ४६७ मतदार, उस्मानाचाद विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९५ हजार ८३८ पुरुष, १ लक्ष ७७ हजार ६३८ श्री, १७ तृतीयपंथी व भारतीय सैन्यातील असलेले ६३० मतदार असे एकूण ३ लक्ष ७४ हजार १२३ मतदार आणि परंडा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ७४ हजार ७६१ पुरुष, १ लक्ष ५४ हजार ८३६ स्त्री, ६ तृतीयपंथी आणि ७९९ भारतीय सैन्यात असलेले जिल्ह्यातील मतदार असे एकूण ३ लक्ष ३० हजार ४०२ मतदार असे एकूण १४लक्ष २ हजार ३२५ मतदार मतदानांचा हजा बजावणार असल्याचे डॉ. ओंबासे यांनी सांगितले.

डॉ. ओंबासे पुढे म्हणाले की, २० नोवोंबर २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी जिल्हयातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये ७ लक्ष ३६ हजार ८९७ पुरुष, ६ लक्ष ६२ हजार ६७० रात्री, ३९ तृतीयपंथी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जिल्हयातील २७१९ मतदार असे एकूण १४ लक्ष २ हजार ३२५ मतदार मतदानाचा हक बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT