0.09% live stock in the dam as of 6 am today.
धाराशिव

मांजरा धरण जीवंत साठ्यात, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

पुढारी वृत्तसेवा
परमेश्वर पालकर

कळंब : तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर या शहरांना पाणीपुरवठा करणारे व कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर या भागातील शेतकरयांचे अर्थकारण सदृढ करणारे मांजरा धरण आज पहाटे जिवंत साठ्यात आले असल्याचे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

आज सकाळी सहा वाजता 0.09% धरणात जीवंत साठा झाला आहे. सध्या मांजरा धरणात 0.607 दलघमी आवक सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. धरण परिसरात व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरवातीपासूनच पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीवर हिरवा शालू पसरला आहे. असाच पाऊस सुरू रहायला तर धरण या वर्षी भरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संततधारने सोयाबीन पिवळे

गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरयांचे प्रमुख पीक सोयाबीन पिवळे पडत आहे. जर दोन दिवसात सुर्य दर्शन झाले नाही. तर सोयाबीन पिक जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या वरच्या भागातील मांजरा नदीवरील महासांगवी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला असुन त्यामधील विसर्गाने संगमेश्वर मध्यम प्रकल्प 30 टक्के क्षमतेने भरला आहे. यामुळे महासांगवी धरणाचे विसर्जित पाणी संगमेश्वर प्रकल्पात येते. यामुळे संगमेश्वर प्रकल्प लवकरच भरून मांजरा धरणात आवक वाढणार आहे. त्यामुळे यावर्षी मांजरा धरण लवकर भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT