अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या निकालामध्ये माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलने वर्चस्व स्थापन केले. परळीमध्ये देखील त्यांच्या पॅनलला बहुमत सिद्ध झाले आहे. प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळणारे माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बाजार समितीचे प्रशासक गोविंद देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे.
अंबाजोगाई बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख हे राजकीय प्रशासक म्हणून होते. त्यांच्या दोन वर्षाच्या प्रशासकीय काळातील कामकाजाची दखल घेत मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच माजी पालकमंंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे माजी आमदार संजय दौड यांनी महाविकास आघाडीचे पॅनल स्थापन केले होते. त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत बाजार समिती महाविकास आघाडीकडे खेचून आणण्यात त्यांना यश मिळवले आहे.
ग्रामपंचायत मतदार संघातून बाळासाहेब उर्फ आनंद देशमुख, सत्यजीत सिरसाट, तानबा लांडगे, लक्ष्मण करनर तर सोसायटी मतदार संघातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, रामलिंग चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती विलास सोनवणे, शिवाजी सोमवंशी, बालासाहेब सोळंके, आगळे सरस्वती, माजी जिल्हा परिषद सदस्या सुचित्रा देशमुख, खापरटोनचे सरपंच गौतम चाटे, कानडीचे सोसायटीचे चेअरमन चिमु पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे.
व्यापारी मतदार संघातून भूषण ठोंबरे व पुरूषोत्तम भन्साळी, तर हमाल मापाडी जलाल इमाम गवळी हे विजयी झाले आहेत. आमदार नमिता मुंदडा यांच्या पॅनल मधून व्यापारी मतदार संघातून दोन व हमाल तोलाई मतदार संघातून १ या तीन उमेदवारावरच समाधान मानावे लागले आहेत. या निवडणूकीमध्ये माजी आमदार संजय दौंड, माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक बबन लोमटे, राष्ट्रवादी काँगे्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. यांचीच प्रतिष्ठा यशस्वी झाली.