मराठवाडा

हिंगोली : जवळाबाजार झिरो- वसमत बस सुरू करण्याची शाळकरी विद्यार्थ्यांची मागणी

अमृता चौगुले

जवळाबाजार (हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : एस. टी. महामंडळाकडून  जवळाबाजार ते झिरो फाटा वसमत अशी बससेवा सुरू होती. परंतु गेल्या‍ काही दिवसापासून ही बससेवा बंद करण्यात आली आहे. यामूळे या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.

जवळाबाजार परिसरातील ५० ते ६० गावातील नागरीक या बसस्थानकावरून दररोज प्रवास करतात. तसेच या परिसरातील मुल व मुली शिक्षणासाठी नांदेड जातात. तर येथील बाजार पेठ माल खरेदीस नांदेड बाजार पेठ महत्वाची असल्याने दररोज प्रवाशांना नांदेडला ये-जा करावी लागते.

वसमत डेपोतून जवळाबाजार झिरोफाटा मार्ग वसमत बसच पूर्वी सुरू होती. या फेरीतून डेपोस उत्पन्न मोठ्याप्रमाणात मिळत हाते. परंतु गेल्‍या काही दिवसापासून बर बंद केली आहे. ही बससेवा पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू करावी अशी मागणी, परिसरातील नागरीक, शाळकरी मुले- मुलीं, पालकांसह व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT