मराठवाडा

जालना नगरपालिका आता महापालिका

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  जालना नगरपालिकेचे रूपांतर आता महानगर पालिकेत करण्यात आले आहे. त्यानुसार जालना ही महाराष्ट्रातील २९ वी महापालिका म्हणून घोषित झाली असून त्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे.

जालन्याची स्टील इंडस्ट्रीज तसेच मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती.
यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर बुधवारी सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्याबाबतचा आदेश जारी केला.

राज्यातील एकूण महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण- डोंबिवली, वसई-विरार शहर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिका, नवी मुंबई " महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, मीरा- भाईंदर महानगरपालिका, भिवंडी निजामपूर महानगरपालिका, अमरावती, – नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, अकोला, उल्हासनगर, सांगली, मिरज- कुपवाड शहर महानगरपालिका, मालेगाव, जळगाव, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT