छत्रपती संभाजीनगर

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

सोनाली जाधव

टाकळी अंबड : आषाढी एकादशीच्या पर्वावर श्री विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शुक्रवारी (दि.२८) दुपारी चार वाजता ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून श्रीक्षेत्र आपेगावहून पंढरपूरकडे प्रस्थान होईल.

यंदा या पालखी सोहळ्याचे ८४५ वर्ष आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान श्रीक्षेत्र आपेगावचे अध्यक्ष अध्यात्म विवेकी गुरुवर्य ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व दिंडी प्रमुख भानुदास महाराज कोल्हापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा पालखी सोहळा निघणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, नगर बीड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यातून या पायी वारीचा एकूण २७० किलोमीटरचा पायदळ प्रवास असून एकूण १९ दिवसांचा प्रवास, मुक्काम असणार आहे. या पायी दिंडी सोहळ्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार महिला, पुरुष भाविकांचा मोठा सहभाग असणार आहे.

आपेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी सोहळ्यातील दिंडी मार्ग

  1. शुक्रवार २८ जून: संत ज्ञानेश्वर महाराज माऊली मंदिरातून प्रस्थान व मातापिता मंदिरात मुक्काम
  2. २९ जून: मातापिता मंदिरातून सकाळी ८ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान, कुरणपिंप्री मार्गे येथे मुक्काम.
  3.  ३० जून: शिंदे वस्ती हदगाव मार्गे (बोधेगाव) येथे मुक्काम.
  4. एक जुलै लाड जळगाव, शेकटा पारगाव मार्गे (दराडे वस्ती) येथे मुक्काम.
  5. दोन जुलै मातोरी मार्गे (बोरगाव संस्था चकला) येथे मुक्काम,
  6. तीन जुलैः बोरगाव संस्था, राख वस्ती, देवकर वस्ती मार्गे (आर्वी) येथे मुक्काम.
  7. चार जुलै पाडळी मार्गे (नागरेची वाडी) येथे मुक्काम.
  8. ५ जुलै : डोळ्याची वाडी सांगळ्याची वाडी मार्गे (नाळवंडी) येथे मुक्काम.
  9. सहा जुलैः डोंगरकिन्ही, मळेकर वस्ती मार्गे (पाटोदा) येथे मुक्काम.
  10. सात जुलै : बिनवडे वस्ती, नफरवाडी मार्गे (पारगाव घुमरे) येथे मुक्काम.
  11. आठ जुलै : अनपटवाडी डोंगर पायथा मार्गे (जायभायेवाडी) येथे मुक्काम.
  12. नऊ जुलै : दत्त वस्ती, गोवळवाडी मार्गे, (खर्डा) येथे मुक्काम.
  13.  १० जुलै अंतरवाली, जेजला, माळीवस्ती मार्गे ( १४) आंबी) येथे मुक्काम.
  14. ११ जुलैः कुक्कडगाव, अनाळा, मुगाव मार्गे (कंडारी) येथे मुक्काम,
  15.  १२ जुलै: पिंपरखेडा, गटकुळ वस्ती मार्गे (परंडा) येथे मुक्काम,
  16. १३ जुलैः आवर पिंप्री, लुंगसे वस्ती मार्गे (भाकचंद धोका) येथे मुक्काम.
  17. १४ जुलै : कुडुवाडी, ढोरे वस्ती मार्गे (सा.स.मंडप आरण) येथे मुककाम.
  18. १५ जुलै महाडिक मळा, समर्थ वस्ती मार्गे (मेंढापुर) येथे मुक्काम.
  19. १६ जुलैः गणपती मंदिर, शिंदे बस्ती मार्गे (पंढरपूर) येथे मुक्काम.
  20. १७ जुलै रोजी पंढरपुरात पालखी सोहळा दाखल होईल.

या पालखी सोहळ्यात तीन रिंगण होणार आहेत

  • पहिले घोडा रिंगण मंगळवारी (दि.दोन) दुपारी १ वाजता मातोरी येथे होईल.
  • दुसरे रिंगण सोमवारी (दि.८ जुलै) दुपारी ३ वाजता डोंगर पायथा येथे होईल.
  • तिसरे रिंगण मंगळवारी (दि. १६) र दुपारी दीड वाजता गणपती मंदिर पंढरपूर येथे होणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT