पारध (छत्रपती संभाजीनगर) : भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील जिल्हा परिषदेची शाळा भौतिक सुविधांच्या संदर्भात कायम चर्चेत असते. माध्यमाने वेळोवेळी मुद्दे लावून धरल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने शाळे सरंक्षण भिंत व गेटचे काम करण्यात आले. मात्र या कामाचे उद्घाटन होण्यापूर्वीच हे गेट कोसळून पडले. सुदैवाने त्या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
पारध बु.येथील ही जिल्हा परिषदेची शाळा कायम वर्गखोल्यांची कमतरता,शिक्षकांची वानवा यासह शालेय परिसरात साचत असलेल्या सांडपाण्याचा मुद्दा,शाळेत जाण्याच्या रस्त्याची दुरवस्था असो की आवार भिंतीचा मुद्दा यामुळे चर्चेत असते. या संदर्भात दै.पुढारी सातत्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला याची दखल घेत पारध बु.ग्राम पंचायतने 15 व्या वित्त आयोगातून 12 लाख रुपये खर्चाचे वॉल कंपाऊंड आणि दोन क्विंटल वजनाच्या लोखंडी गेटचे काम करण्यात आले. मंगळवारी (दि.19) सकाळी नऊ साडे नऊ वाजेच्या सुमारास शाळा भरण्याच्या वेळेस शिक्षक कर्मचारी सदरचे नवीन गेट उघडत असताना हे गेट निखळून पडले. सुदैवाने यावेळी सर्व विद्यार्थी प्रार्थनेसाठी ग्राउंडवर असल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित विभागाच्या वतीने याकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
आठ दिवस अगोदर बसवण्यात आलेला महाराजा गेट हे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे हे गेट आज सकाळी शाळा उघडायच्या वेळेस कोसळले आहे. जिल्हा परिषद शाळेचा आज हा मोठा अनर्थ टळला सुदैवाने कुठेही हानी झाली नाही. ज्या कॉन्टॅक्टरने हे निकृष्ट गरजेच काम केलं त्यांनी त्वरित आठ दिवसांत या शाळेला नवीन गेट बसावं.विनोद लोखंडे, अध्यक्ष शालेय समिती
शाळेची सरंक्षण भिंतीला गेट लावून सात दिवस झाले. सातव्या दिवशीच गेट तुटून खाली पडले, असे निकृष्ट दर्जाचे काम केले. शाळेचे गेट उघडायच्या वेळेस शिक्षक असल्यामुळे त्वरित गेट पकडल्या गेले त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टरने हे निकृष्ट काम केले असेल त्यांनी त्वरित शाळेला नवीन गेट बसावावे.परमेश्वर लोखंडे, माजी पंचायत समिती सभापती