राहूल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Protest : युवासेनेचे काँग्रेसविरोधात आंदोलन

आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एआय समिट मध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी टीव्ही सेंटर चौक येथे जोरदार निदर्शने केले. याप्रसंगी संतप्त आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

युवा सेनेचे सचिव निलेश शिंदे, युवासेना कार्यकारी सदस्य हर्षदा सिरसाठ, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी भगुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कॉग्रेस तसेच नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

याप्रसंगी अर्जुन रेड्डी, पद्माकर बकले, चेतन खुर्दे, प्रज्वल ढवळे,आश्लेष कुमावत, विशाल घुगे, सनी साळवे, पीयूष पाटील, संदीप गोसावी, सुरेश जाधव, संदीप भालेराव, निलेश गडलिग, विजय सुरडकर, इम्रान पटेल, चंदू लोखंडे, शिवाजी चोरमारे, अजय देवकर, कृष्ण सोनवणे, यश वानखेडे, निखिल काकडे, बॉबी जाधव सोनू खरात, सागर चाटे, सुरेश जाधव, अभिषेक हेकाडे आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT