Youth who handled Mukya Salve's country-made pistol put behind bars
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवर स्क्रॅप व्यापाऱ्याची निघृण हत्या करून सध्या हर्मूल कारागृहात असलेला कुख्यात गुन्हेगार मुकेश ऊर्फ मुक्या साळवे याचा गावठी कट्टा सांभाळणाऱ्या एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशु सतीश खोमणे (१९, रा. मुकुंदवाडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.
त्याच्याकडून मॅग्झिनसह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी रविवारी (दि. ११) दिली.
पोलिसांच्या नवरात्रोत्सवाच्या माहितीनुसार, पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी हद्दीत गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याचे आदेश पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी विशेष पथकाला दिले होते. दरम्यान, मुकुंदवाडी विशेष पथकातील अंमलदार संतोष भानुशे
यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एका तरुणाने संतोषीमातानगर येथील दोन एकर मैदानाच्या भिंतीलगत स्टील बनावटीचा गावठी कट्टा लपवून ठेवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन संतोषीमातानगर परिसरात छापा टाकला. तेथे संशयितरीत्या फिरणाऱ्या प्रियांशु खोमणे याला
पथकाने ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. चौकशीत त्याने संतोषीमाता नगर येथील दोन एकर मैदानात एका भिंतीलगत मॅग्झिनसह गावठी कट्टा लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी जागेची पाहणी करून कट्टा जप्त केला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस गांगुर्डे करत आहेत.
मुक्याने जालन्यातून आणलेला कट्टा विद्यार्थ्याकडे सोपवला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियांशु खोमणे हा जिम पदवीचे शिक्षण घेत असला तरी त्याची कुख्यात गुन्हेगार मुक्या साळवे टोळीसोबत उठबस होती. जुलै २०२६ मध्ये स्वतःचा वाढदिवस गोव्यात आलिशान क्रूझवर साजरा करण्यासाठी पैसे गोळा करण्याच्या हेतूने मुक्याने त्याचा साथीदार विक्की ऊर्फ सोनू पाचवणे याच्या मदतीने अब्दुल बासित हकीम खान या स्क्रॅप व्यावसायिकाची लुटमारीच्या उद्देशाने जालना रोडवर चाकू भोसकून निघृण हत्या केली होती. या गुन्ह्यात मुक्या साळवे सध्या हर्सल जेलमध्ये आहे. या हत्येपूर्वी मुक्याने जालन्यातून गावठी कट्टा आणला होता. खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये जाण्यापूर्वी त्याने हा कट्टा प्रियांशु याच्याकडे लपवून ठेवण्यासाठी दिला होता.