Youth stabbed : कन्नड शहर पोलिस ठाण्यासमोर तरुणाचा चाकूने भोसकून खून File Photo
छत्रपती संभाजीनगर

Youth stabbed : कन्नड शहर पोलिस ठाण्यासमोर तरुणाचा चाकूने भोसकून खून

घरगुती वादाच्या मध्यस्थीसाठी आलेल्या एका तरुणाचा चाकूने भोसकून खून

पुढारी वृत्तसेवा

Youth stabbed to death in front of Kannad City Police Station

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पोलिस ठाणे समोरील रेणुका ज्वेलर्स दुकानासमोर सोमवारी (दि. १५) पहाटे १ ते वाजण्याच्या दीड दरम्यान घरगुती वादाच्या मध्यस्थीसाठी आलेल्या एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत नाविद अक्रम शेख (रा. टिळकनगर, कन्नड) याचा मृत्यू झाला.

वहाब खान उस्मान खान आणि आदिल खान उस्मान खान (दोघे रा. करीमनगर, कन्नड) हे सख्खे भाऊ असून, रविवारी (दि. १४) रात्री ११ वाजता त्यांच्या आईला शिवीगाळ करण्याच्या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.

या प्रकरणी रात्री साडे बारा या वेळेत शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या वादात मध्यस्थी करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आलेल्या नाविद अक्रम शेख व इतरांवर आरोपी नाजीम मॅक्स मुबीन शेख, अण्णा ऊर्फ साबीर शेख नेहाल तसेच अन्य ५ ते ६ जणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नाविद अक्रम शेख यांचा मृत्यू झाला. या घटनेत आरोपींपैकी मुबीन शेख हा देखील जखमी झाला असून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल असताना तेथून तो फरार झाल्याची माहिती आहे.

प्रकरणी बाबा मलिक निहाल शेख, अमेर लाला नेहाल शेख, आण्णा ऊर्फ शाबीर शेख निहाल, मॅक्स ऊर्फ नाझीम सत्तार, मतीन शेख युनूस, मोबीन युनूस शेख आणि जफर शेख अमु या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT