डेक्‍कन ओडिसी रेल्‍वेच्या इंजिनवर चढलेला तरूण गंभीर भाजला File Photo
छत्रपती संभाजीनगर

डेक्‍कन ओडिसी रेल्‍वेच्या इंजिनवर चढलेला तरूण गंभीर भाजला

भाजला गेलेल्‍या तरूणाला घाटी रूग्‍णालयात केले दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

डेक्कन ओडिसी रेल्वेस्थानकात येताच एक अनोळखी तरुण थेट इंजिंनवर चढला. त्याचा स्पर्श विद्युत तारेला झाल्याने तो गंभीररीत्या भाजला गेला. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मुख्य रेल्वेस्थानकावर आज (शुक्रवार) (दि.17) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास डेक्कन ओडिसी 50 विदेशी पर्यटकांना घेऊन छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात आली. ती प्लॅटफॉर्म 2 वर उभी होती. याच दरम्यान एक 30 ते 32 वर्षीय तरुण डेक्कन ओडिसीच्या इंजिंनवर चढून विद्युत तारांना स्पर्श केला. यात तो गंभीर भाजला. तरुण भाजल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना केले.

मनोरुग्ण आसल्याचा अंदाज

कोणाला काही समजण्याच्या आत इंजिंनवर चढलेला तरुण हा मनोरुग्ण असावा अशी शक्यता रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटल्यानंतर कारण समोर येईल अशी माहिती सुरक्षा दलाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT