Crime News File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | सिडकोत भरदिवसा थरार; हॉकीस्टिकने हल्ला करत तरुणाचा खून

कारची दुचाकीला धडक देऊन हॉकीस्टिकने हल्ला; बजरंग चौकातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Cidco Crime News

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-७ भागात दिवसाढवळ्या एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. देवेश चंद्रेश दीक्षित ऊर्फ बंटी दीक्षित ( वय ३५) याच्यावर बजरंग चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर हॉकीस्टिकने हल्ला करण्यात आला. गुरूवारी (दि.२२) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

आधी कारने त्यांच्या स्कुटीला मागून जोरदार धडक देण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या बंटी दीक्षित यांच्यावर हल्लेखोरांनी हॉकीस्टिकने सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पवन पराशेर याचे नाव संशयित म्हणून समोर येत असून, त्याने साथीदारांसह हा हल्ला केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. बंटी दीक्षित हे मेस चालवण्यासोबतच प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. घटनेनंतर सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या हत्येमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT