लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार File Photo
छत्रपती संभाजीनगर

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील एका हॉटेलमध्ये वेळ-ोवेळी सोबत नेऊन दोन वर्षे अत्याचार केला.

पुढारी वृत्तसेवा

Young woman tortured on the pretext of marriage

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील एका हॉटेलमध्ये वेळ-ोवेळी सोबत नेऊन दोन वर्षे अत्याचार केला. पीडितेने लग्नासाठी तगादा लावताच तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय सुरेश पुंड (२५, रा. फाजलपुरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी गुरुवारी (दि.५) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. त्याच हॉस्पिटलसमोर आरोपी अक्षय पुंड याचे दुकान आहे. तिथेच दोघांची ओळख होऊन अगोदर मैत्री झाली. अक्षयने तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. तिला लग्नाचे प्रलोभन दाखवले. २०२३ पासून ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेल मध्ये नेऊन पीडितेसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी पीडित महिला बसपर्यंत पोहोचण्यास थोडा उशीर झाला. याचा राग मनात धरून बसचालक कासीम याने संताप व्यक्त केला. तुला यायला इतका वेळ का लागतो? असे म्हणत त्याने या निष्पाप बालकाच्या डोक्यात बुक्के मारले आणि थोबाडीत लगावली. चालक कासीम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बसमधील इतर विद्यार्थ्यांनाही त्या बालकाला मारहाण करण्यास सांगितले.

मारहाणीनंतर बालक दहशतीत : या प्रकारामुळे ९ वर्षांचा तो चिमुरडा प्रचंड हादरून गेला असून, गेल्या आठ दिवसांपासून तो कमालीच्या दहशतीखाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बसमध्ये महिला केअर टेकर उपलब्ध असूनही चालकाची मुजोरी सुरूच होती. यापूर्वीही मुलाला लघुशंकेला जावे लागल्यास हा चालक गाडी थांबवण्यास नकार देऊन मुलाचा छळ करत असल्याचे पालकांनी सांगितले.

तुझा फक्त अटीट्युड कमी करायचा होता...

ोपीने पीडितेला आमखास मैदानाकडे नेले. तिथे माझा पोलिस ठाण्याबाहेर आपण बोलू, असे म्हणत आर-नंबर ब्लॉक का केला आणि आता लग्नाला नकार का देत आहेस ? अशी विचारणा पीडितेने केली. त्यावर आरोपीने तुमच्या जातीच्या मुलीसोबत लग्न कोण करणार? मला फक्त तुझा अटीट्युड कमी करायचा होता. तू सुरुवातीला मला नकार दिलास, त्यामुळे मी फक्त तुझा वापर करून घेतला.

मला तुझ्याशी लग्न करण्यात कोणताही रस नाही. आता या स्टेजला मी तुला आणून ठेवले आहे की, इतर कोणीही तुझ्याशी लग्न करणार नाही, असा निर्लज्ज युक्तिवाद करत त्याने जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिथून पळ काढला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपी अक्षय पुंड याच्याविरुद्ध अत्याचार अॅट्रॉसिटीसह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT