Crime News  pudhari
छत्रपती संभाजीनगर

Gangapur Crime News : रस्त्यात अडवून तलवारीने वार; तिघांविरोधात गुन्हा

गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : तालुक्यातील नेवरगाव शिवारात शेतात गवत आणण्यासाठी जाणाऱ्या दोघांना रस्त्यात अडवून शिवीगाळ, मारहाण करत तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२१) सायंकाळी घडली. या हल्ल्यात एका तरुणाच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून त्याला दहा टाके पडले आहेत.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती सोपान पवार, पुष्पा निवृत्ती पवार व शुभम निवृत्ती पवार (सर्व रा. नेवरगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

सतीश दत्तात्रय पवार (वय ३२, रा. नेवरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अभिषेक चांगदेव पवार (वय २७) यांच्यासह शेतात गवत आणण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी निवृत्ती सोपान पवार, पुष्पा निवृत्ती पवार व शुभम निवृत्ती पवार यांनी त्यांचा रस्ता अडवून वाद घालत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर पुष्पा पवार हिने अभिषेक पवार यांच्या पाठीत दगड मारून जखमी केले. तर शुभम पवार याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, निवृत्ती पवार याने हातातील लोखंडी तलवारीने सतीश पवार यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतीश यांनी प्रसंगावधान राखत हात पुढे करून वार अडवला. यात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून हाताला दहा टाके पडले आहेत. या प्रकरणी सतीश पवार यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. नि कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT