Fraud Case : दुकान विक्रीच्या बहाण्याने तरुणाची २५ लाखांची फसवणूक (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : दुकान विक्रीच्या बहाण्याने तरुणाची २५ लाखांची फसवणूक

सिटी चौक पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Young man cheated of Rs 25 lakhs on the pretext of selling shop

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या मालकीचे नसलेले दुकान दाखवून, ते विकण्याच्या बहाण्याने एका तरुणाची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आम्ही हज यात्रेला जाऊन आल्यावर दुकान नावावर करून देतो, अशी थाप मारून आरोपींनी पैसे उकळले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात परतूर (जि. जालना) येथील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसीरुल्ला खाँ अब्दुल्ला खाँ कायमखानी आणि साजीद अली खान (रा. मोमीन मोहल्ला, परतूर, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी मोहसीन हुसेन जाफरी (२५, रा. शहाबाजार, अली मंजिल) यांना व्यवसायासाठी एक दुकान खरेदी करायचे होते. त्यांच्या ओळखीचे एजंट नसीरुल्ला खाँ आणि साजीद अली खान यांनी मंजूरपुरा येथील (सिटी सर्व्हे नं. ६८४३/२/२७) ११० फूट क्षेत्रफळाचे एक दुकान त्यांना दाखवले आणि ते त्यांच्याच मालकीचे असल्याचे भासवले. दुकान पसंत पडल्याने २५ लाख रुपयांत खरेदीचा व्यवहार ठरला.

१२ जुलै २०२३ रोजी शहाबाजार येथील एका कार्यालयात फिर्यादीने आरोपींना १२ लाख रुपये रोख दिले व १०० रुपयांच्या बाँड पेपरवर साजीद खान याच्या समक्ष लिहून घेतले ऑक्टोबर २०२३ आरोपींनी मोहसीन यांच्या घरी जाऊन आणखी ८ लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर मात्र दुकान नावावर करून देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ सुरू केली.

२ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपी पुन्हा आले आणि त्यांनी आम्ही हज यात्रेवरून १ महिन्याच्या आत जाऊन आल्यावर सदर दुकान तुझ्या नावावर करून देऊ, असे सांगून उर्वरित ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार मोहसीन यांनी एचडीएफसी बँकेच्या धनादेशाद्वारे ५ लाख रुपये दिले.

दुकान दुसऱ्याच्याच मालकीचे निघाले

हज यात्रेवरून परत आल्यानंतरही आरोपींनी दुकान नावावर करून दिले नाही. सततच्या टाळाटाळीमुळे फिर्यादीने स्वतः त्या दुकानाची चौकशी केली असता, ते दुकान मुस्ताक ऊर्फ गुड्डू (रा. मंजूरपुरा) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहसीन जाफरी यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मंगळवारी (दि. ११) सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT