Electrocution death news 
छत्रपती संभाजीनगर

Electrocution death news | अनधिकृत होर्डिंग काढताना शॉक लागून कर्मचारी ठार

Chhatrapati Sambhajinagar news | मुकुंदवाडीतील दुर्घटना, एक कर्मचारी जखमी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी (दि. २१) सकाळी मुकुंदवाडी येथील एका मंदिरावर असलेले अनधिकृत होर्डिंग काढताना अचानक होर्डिंगचे कॉर्नर ३३ के.व्ही.च्या विजेच्या तारेला लागले. त्यामुळे जोरदार शॉक लागून एक कर्मचारी जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीररित्या भाजला.

अमोल दिनकर जाधव (वय 27 रा. मुकुंदवाडी, संजयनगर ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर रवी रणधीर रिडलाॅन (वय 38) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी सिग्मा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर असलेले अनाधिकृत होर्डिंग्ज काढत असताना सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. होर्डिंगला लोखंडी फ्रेम होते. होर्डिंग्ज काढल्यानंतर ते 33 केव्ही तारेला लागल्याने ही दुर्घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT