Woman seriously injured in wild boar attack
वरठाण, पुढारी वृत्तसेवा : शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अचानकपणे रानडुकराने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवार (दि.६) दुपारी एक वाजता अंजोंळा शिवारात घडली. कांताबाई जयसिंग परदेशी (वय ४२) रा. वाकडी असे जखमी महिलेचे नाव आहे.
कांताबाई परदेशी अंजोळा
शिवारात गट न.१०८ मधील आपल्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अचानकपणे रानडुकराने यांच्यावर हल्ला करीत माडीला कडाडून चावा घेऊन गंभीररीत्या जखमी केले आहे. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाकडीसह अंजोळा, तिडका, वरठाण, बनोटी, परीसरात रानडुकरांचा मोठा उपद्रव वाढला असून दिवसेंदिवस रानडुकरांची संख्यादेखील वाढत असून रब्बी पिकातील लागवड केलेल्या मका पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. त्यातच शेतकरी त्यांना हुलकावणीसाठी जात असताना अंगावरदेखील धावून येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जयसिंग परदेशी, गोकुळ परदेशी, पोपट परदेशी, बाळू धुमाळ आदी शेतकऱ्यांनी केली.