लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; व्यापाऱ्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; व्यापाऱ्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मिर्झा बेग याला बेड्या ठोकल्या.

पुढारी वृत्तसेवा

Woman raped on the pretext of marriage; Businessman remanded in police custody till April 4

संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एका ५७ वर्षीय व्यापाऱ्याला सिटी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी २ एप्रिल रोजी दिले. मिर्झा इरफान बेग अहमद बेग (५७, रा. शहाबजार) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात पीडित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडित महिला शहाबाजार परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात काम करत असताना आरोपीशी तिची ओळख झाली. आरोपीने स्वतः अविवाहित असल्याचे सांगत तिच्याशी जवळीक वाढवली. १६ मे २०२३ रोजी परफ्युम घेण्याच्या बहाण्याने शोरूममध्ये नेऊन दरवाजा लॉक करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढे आरोपीने भाड्याने घर घेऊन देत तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली. त्याच काळात आरोपीच्या चार मि?ांनी मौलानाला घरी बोलावून निकाह वाचून दाखविण्यात आला व मुस्लिम रितीरिवाजांनुसार निकाह झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आरोपी आधीपासून विवाहित असून, त्याला मुले असल्याचे समजल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले.

वादानंतर महिला वेगळी राहू लागली तरी आरोपीने तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेषतः मार्च २०२६ मध्ये पुन्हा अत्याचार झाल्यानंतर पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मिर्झा बेग याला बेड्या ठोकल्या.

आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता के. एन. पवार यांनी, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. निकाहप्रकरणी संबंधित व्यक्तींची चौकशी करायची आहे. वेगळे राहिल्यानंतरही झालेल्या जबरदस्तीच्या घटनांचा तपास करायचा आहे. याशिवाय आरोपीला गुन्ह्यात कोणी मदत केली का, याचाही तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT