Sambhajinagar Fraud Case : सायबर भामट्यांचा महिलेला ३५ लाखांचा गंडा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Fraud Case : सायबर भामट्यांचा महिलेला ३५ लाखांचा गंडा

शेअर मार्केटसंबंधी फेसबुकवरील जाहिरातीवर संपर्क करणे पडले महागात

पुढारी वृत्तसेवा

Woman duped of Rs 35 lakh by cyber criminals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फेसबुकवरील जाहिरातीवर संपर्क करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. सायबर भामट्यानी झिरोधा ब्रोकिंगच्या नावाने बोगस अॅप डाउनलोड सांगून करण्यास त्यावर गुंतवणुकीवर ६३ टक्क्यांपेक्षा अधिक नफा, लाखोंचा फायदा दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर ३४ लाख ८७ हजार ६७ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार ४ ते २१ जुलै दरम्यान जिन्सी टॉवर, खासगेट जवळ घडली.

फिर्यादी मरियम नुसरत खान (३५, रा. जिन्सी टॉवर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती एका नामांकित कंपनीत ब्रँच मॅनेजर आहेत. ४ जुलै रोजी रात्री त्या फेसबुक पाहत असताना त्यांना निरोधा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीची एक जाहिरात दिसली. त्यावर दिलेल्या नंबरवर त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क करून गुंतवणूक करण्यास असल्याचे तयार सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी श्रुती शिधवाणी हिने संपर्क करून गुंतवणुकीची सर्व माहिती देत एक लिंक पाठवून ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. मात्र लिंकवर क्लिक करताच लुमीयेन मॅक्स हे अॅप ओपन झाले. श्रुतीने हे डिमॅट खाते असून, त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवितो. तुम्ही पैसे मी दिलेल्या बँक खात्यात टाका, असे सांगून बँक खाते क्रमांक दिला. त्यावर मरियम यांनी सुरुवातीला ५ हजार, नंतर २० हजार रुपये गुंतवले असता थोडासा नफा मिळाल्याचे दाखवले गेले.

यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढवून मोठ्या रकमा गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. या काळात भामट्यांनी नफा दाखवून टप्प्याटप्प्याने ५, ८, १४ लाख अशा रकमा वसूल केल्या. एकूण गुंतवणूक ३४.८७ लाखांवर पोहोचली. झिरोधा कंपनीचे विनिंग सर्टिफिकेट पाठविण्यात आले. लाखोंचा नफा बोगस अॅपवर दिसत होता, मात्र प्रत्यक्षात पैसे भामटे त्यांच्या बँक खात्यात घेत होते.

पैसे काढायचे असतील तर टॅक्स भरा

मरियम यांनी गुंतविलेले पैसे काढायचे असल्याचे सांगताच त्यांना १५ टक्के टॅक्स भरण्यास सांगून आणखी ५ लाखांची मागणी केली. सेबी नंबरसह झिरोधा कंपनीचे पत्र पाठविले. टॅक्स भरला तरच पैसे परत मिळतील सांगितल्याने मरियम यांनी २५ हजार यांनी पाठवले. तरीही पैसे मिळाले नाही. पुन्हा २० टक्के ब्रोकरेज भरावा लागेल तरच पैसे परत मिळतील, असे सांगितल्याने मरियम यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत भामट्याने तब्बल ३४ लाख ८७ हजार त्यांचे लुबाडले होते. त्यांनी लगेच एन-सीआरपी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली. त्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.२) गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT