Snake bite death: शेतात काम करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Snake bite death: शेतात काम करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

बोरमाळ तांड्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

वरठाण : शेतात निंदणीचे काम करतांना अचानक पिकांमध्ये असलेल्या नाग प्रजातीच्या सापाने दंश केल्याने महिला शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तिडका शिवारात रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. रात्री आठ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत झाल्याची घोषित केले. रुखमाबाई शिवा जाधव (वय ६०,रा. बोरमाळ तांडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

सदर महिला शेतात पिकांच्या निंदणीचे काम करत असताना अचानक दगडाखाली असलेल्या नाग प्रजातीच्या सापाने तिला पायावर दंश केला असता ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला पाचोरा येथे हलविण्यात आले. परंतु तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. तिच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तिच्यावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT