Sanjay Shirsat : संभाजीनगरला स्वच्छतेत पहिले स्थान मिळवून देऊ file photo
छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat : संभाजीनगरला स्वच्छतेत पहिले स्थान मिळवून देऊ

कचरा संकलन कामाचा शुभारंभ; पालकमंत्री शिरसाट यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

We will secure the first place for Sambhajinagar in cleanliness

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

देशातील स्वच्छता अभियानात छत्रपती संभाजीनगर महापालिकेला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (दि. १) दिले. अयोध्यानगरीच्या मैदानावर नव्या कंपनीच्या कचरा संकलन कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहनिर्माण तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी, शहराला देशात नंबर वन स्वच्छ शहर करायचे असेल, तर सर्व शहरवासीयांनी एकजूट होऊन कचरामुक्तीसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. शहराची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व आवश्यक विकासकामांना गती दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगार दिनानिमित्त यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी प्रास्ताविक, तर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी आभार मानले.

ड्रेनेज सफाईसाठी मिळणार एन्डोबोट

पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, ३६ मीटर उंचीच्या इमारतींमधील बचावकार्यासाठी नुकतेच अग्निशमन दलाला उंच शिडीचे वाहन देण्यात आले आहे. तसेच, कामगारांना ड्रेनेजमध्ये उतरावे लागू नये, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत महापालिकेला लवकरच अत्याधुनिक एन्डोबोट उपलब्ध करून दिले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT