Sanjay Shirsat Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat : अभिजित दीपकेच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळवून देऊ

मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

We will secure police protection for Abhijit Deepke's family

छत्रपती संभाजीनगर : 'कॉकरोच जनता पार्टी' चे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या आई-वडिलांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी अभिजितचे कौतुक करत त्याला व कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यांच्या अभिजित दीपके नेतृत्वाखालील 'जेन झी' तरुणांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पायउतार व्हावे लागले. या यशानंतर मंत्री शिरसाट यांनी थेट दीपके यांचे घर गाठले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मला अभिजितच्या कुटुंबीयांना भेटायला यापूर्वीच यायचे होते. मात्र, माझ्या आधी येण्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटले असते आणि आंदोलनाला वेगळा रंग लागला असता.

त्यामुळे मी ती भेट टाळली. आता अभिजितला एवढे मोठे यश मिळाले आहे आणि तो माझ्या मतदारसंघातील तरुण आहे. आपल्या मतदारसंघातील तरुणाने एवढे मोठे यश मिळवल्यावर त्याच्या पाठीशी उभे राहणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT