Paithan News : गोदावरी स्वच्छतेसाठी स्वयंसेवक एकवटले file photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan News : गोदावरी स्वच्छतेसाठी स्वयंसेवक एकवटले

पैठण येथे प्रोजेक्ट अमृत संत निरंकारी मिशनद्वारे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत मराठवाड्यातून आलेल्या स्वयंसेवकांनी मोक्ष घाटासह गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविला.

पुढारी वृत्तसेवा

Volunteers unite to clean Godavari

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथे प्रोजेक्ट अमृत संत निरंकारी मिशनद्वारे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत मराठवाड्यातून आलेल्या स्वयंसेवकांनी मोक्ष घाटासह गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविला.

अभियानात माजी नगरसेवक भूषण कावसानकर, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड क्षेत्रीय संचालक विजय बोडखे यांनी सहभाग घेऊन गोदावरी नदी स्वच्छ करण्याचे अभियान यशस्वी केले आहे.

येथील गोदावरी नदीसह देशभरात १६०० ठिकाणी एकाच वेळी जलस्वच्छता अभियान अंतर्गत रविवारी (दि.२२) संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानाचा चौथ्या टप्प्याचा पैठण येथे सकाळी ८ ते ११ यादरम्यान अभियान राबविण्यात आले.

देशात २५ राज्यांमधील ९३० शहरांमधील १६०० ठिकाणी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी हेअभियान संपन्न झाले. यात माजी नगरसेवक भूषण कावसनकर, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड यांनी सहभाग घेत मराठवाड्यातून आलेल्या स्वयंसेवकासोबत गोदावरी नदी स्वच्छ केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT