District Bank Election : मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधवांसह दिग्गजांची मैदानात उडी file photo
छत्रपती संभाजीनगर

District Bank Election : मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधवांसह दिग्गजांची मैदानात उडी

जिल्हा बँक निवडणूक : ४ दिवसांत ७७ अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

Veterans including Minister Atul Save, MLA Sanjana Jadhav jump into the fray

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून, दिग्गजांनी मैदानात उडी घेतली आहे. गुरुवारी (दि.४) भाजपकडून सहकार मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी नगरसेवक राजू शिंदे आणि पुनमचंद बमणे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यापूर्वी बुधवारी कन्नडच्या आमदार संजना जाधव, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाढे यांनी अर्ज भरले होते. गेल्या चार दिवसांत एकूण ७७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आज शुक्रवार (दि.५) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने बँक कार्यालयात दिवसभर इच्छुकांची मोठी गर्दी राहण्याचा अंदाज आहे.

जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालक पदांसाठी ही हायव्होल्टेज निवडणूक होत असून, येत्या ४ जुलै रोजी मतदान आणि ५ जुलैला मतमोजणी होणार आहे. १ जूनपासून बँक कार्यालयातच अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारपर्यंत तब्बल ४०१ अर्जाची विक्री झाली असून, विहित मुदतीत ७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अनेकांनी दोन ते तीन अर्ज भरले आहेत.

बुधवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आ. संजना जाधव, अब्दुल समीर, अर्जुन गाढे यांच्यासह दर्शना राठोड, दादाराव वानखेडे, बाबूराव पवार, अब्दुल जावेद, मनोज राठोड यांचा समावेश होता. तर गुरुवारी मंत्री अतुल सावे, किशोर शितोळे, राजू शिंदे यांच्यासह दिनेशसिंह परदेशी, रामराव शेळके, जगन्नाथ काळे, सुनंदा गायकवाड, प्रभाकर काळे, वाजेद खान, दिलीप बनकर, अर्जुन पाटील, विशाल कदम आणि रमेश पाटील यांनी अर्ज दाखल केले.

महिला प्रतिनिधी गटासाठी ६ अर्ज

बँकेच्या दोन महिला प्रतिनिधी संचालक पदासाठी जिल्ह्यातील ६ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सुवर्णा जाधव, पार्वताबाई जाधव, शोभा निकम, मंदाबाई राठोड, शीतल निकम आणि नीलिमा पाटील यांचा समावेश असून, या गटातही चुरस पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT