Vehicle owners troubled by RTO regulations; 60 km round trip for passing
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील वाहनधारकांचा समावेश आहे. असे असतांनाही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातीलकाही गावांतील वाहधारकांना वैजापूर उपप्रादेशिक कार्यालयातून नोंदणी करण्याचे सांगण्यात येत असल्याने वाहनधारक संभ्रमात असून, या नियमांमुळे विनाकारण ६० किलोमीटरचा फेरा मारण्याची वेळ वाहनध ारकांवर आली आहे.
नुकतेच वैजापूरला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मिळाले आहे. तेथील नोंदणी क्रमांक एमएच-५७ असा आहे. कार्यालयाअंतर्गत वैजापूर शहर, तालुका तसेच गंगापूर शहर आणि तालुका यातील वाहनधारकांचा समावेश आहे. येथील वाहनधारकांच्या वाहनांना एमएच-५७ हा नोंदणी क्रमांक मिळतो.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव, वडगाव, साजापूर करोडी, गोलवाडी, पंढरपूर आदी गावांतील वाहनधारकांना एमएच-२० ऐवजी एमएच-५७ असा नोंदणी क्रमांक मिळत असल्याने वाहनध-या ारक त्रस्त झाले आहेत. संभाजीनगर तालुक्याचा वैजापूर येथील आरटीओ कार्यालयात समावेश नसतांनाही त्यांना नाहक वैजापूर कार्यालयात जाण्याची सक्ती केली जात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
पिनकोडनुसार मॅपिंग वैजापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांचा समावेश आहे. गावे समावेश करण्याचा निर्णय हा पिनकोड मॅपिंगनुसार घेण्यात आला आहे. संभाजीनगर तालुक्यातील काही गावे पिनकोड मॅपिंगनुसार जर गंगापूर तालुक्यात दाखवत असतील तर त्यांना वैजापूर कार्यालयातच जावे लागेल. जर त्या गावांना संभाजीनगर तालुक्याचा पिनकोड लागू असेल तर त्यांच्या वाहनांची नोंदणी येथील आरटीओ कार्यालयातच होणार आहे.विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी