वैजापूर : तालुक्यातील राहेगाव गावाजवळ ढेकू नदीत तीन मुले बुडाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (दि.४) सकाळी घडली. यातील दोघांना ग्रामस्थांच्या व प्रशासनाच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात आले असून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास तीन मुले पोहण्यासाठी ढेकू नदीत राहेगाव परिसरात उतरली होती. पाण्याच्या प्रवाहात अडकून ती बुडू लागली. याची खबर लागताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यात दोन मुलांना वाचवण्यात यश आले, परंतु अजय बोरकर (२५, राहणार रायगाव) या तरुणाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार रमेश बोरनारे व प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.