Vaijapur Accident | वैजापूर शहरात भीषण अपघात; भरधाव ट्रकने चार वाहनांना उडवले, ६ ते ७ जण जखमी 
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Accident | वैजापूर शहरात भीषण अपघात; भरधाव ट्रकने चार वाहनांना उडवले, ६ ते ७ जण जखमी

परिसरातील फळ व भाजीपाला विक्रेत्यांचा जखमींमध्ये समावेश

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : शहरातील म्हसोबा चौक परिसरात मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात ६ ते ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, जखमींमध्ये परिसरातील फळ व भाजीपाला विक्रेत्यांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा वेग अतिशय जास्त होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यात दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना मदत केली.

अपघातात जखमी झालेल्या फळ-भाजीपाला विक्रेत्यांचे हातगाडे व मालाचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांना किरकोळ दुखापत झाली असली तरी अनेक जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT