Sillod News : गायरान जमिनीतील अनधिकृत शेततळे जेसीबीने बुजविले file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : गायरान जमिनीतील अनधिकृत शेततळे जेसीबीने बुजविले

तालुक्यातील कासोद येथील गायरान जमिनीत एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत चक्क शेततळे बनवले होते.

पुढारी वृत्तसेवा

Unauthorized farm pond on grazing land filled in using a JCB

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कासोद येथील गायरान जमिनीत एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत चक्क शेततळे बनवले होते. मात्र तक्रारीनंतर बुधवारी (दि.१) महसूल विभागाने कारवाई करीत जेसीबीच्या सहाय्याने बुजविले.

कासोद-तळणी रस्त्याबाजूला गट क्रं. ३५ मध्ये शासकीय गायरान जमीन आहे. यात एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत अनधिकृत शेततळे बनवले होते. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले होते. प्रशासनाने आधी टाळाटाळ केली.

मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला व महसूल प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. बुधवारी महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत अनधिकृत शेततळे बुजले. ही कारवाई अतिरिक्त तहसीलदार अंकिता ताकभाते यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी रुख्मनी माने, तलाठी सुनिता गरुड, ग्रामसेविका कल्पना गवळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी केली.

दरम्यान, तालुक्यात अनेक गावांमधील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. शिवाय पाझर तलावाच्या संपादित क्षेत्रात अनधिकृत विहिरी देखील खोदलेल्या आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT