संभाजीनगरात दुचाकींना दोनशेचेच मिळणार पेट्रोल file photo
छत्रपती संभाजीनगर

Petrol and Diesel : संभाजीनगरात दुचाकींना दोनशेचेच मिळणार पेट्रोल

जिल्हाभरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा विस्कळित; दिवसभर वाहनधारकांची धावाधाव, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Two-wheelers in Sambhajinagar will receive petrol worth only ₹200

संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कित्येक पेट्रोल पंपांवरील ईधनाचा साठा संपल्याने गुरुवारी (दि. २६) दिवसभर वाहनधारकांची धावाधाव सुरू होती. ज्या पंपांवर साठा उपलब्ध होता तिथेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे त्या पंपांवरही दुपारनंतर नो स्टॉकचे बोर्ड लागले.

त्यावर तोडगा माणून जिल्हा प्रशासनाने दुचाकी वाहनांमध्ये दोनशे रुपये आणि चारचाकी वाहनांमध्ये २ हजार रुपयांपर्यंतच पेट्रोल-डिझेल टाकण्याचे निर्देश पंपचालकांना दिले. असे असले तरी प्रशासनाकडून मात्र जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन कंपन्यांचे एकूण ३६५ पेट्रोल पंप आहेत. वा पंपाकडे ५ हजार केएल डिझेल, तर ४ हजार केएल साठा ठेवण्याची क्षमता आहे. मात्र बुधवारपासून या पंपांवर इंधन मिळत नसल्याचे चित्र आहे.

बुधवारी दिवसभर वाहनधारकांच्या पंपांवर रांगा लागल्या होत्या. गुरुवारीही हे चित्र कायम राहिले. शहरातील निम्मे पेट्रोल पंप दुपारीच कोरडे पडले. त्यामुळे पेट्रोल-डिझेल मिळविण्यासाठी वाहनधारक एका पंपावरून दुसत्या पंपावर जाताना दिसत होते. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने दुचाकीत दोनशे आणि तीन चाकी व चारचाकीत दोन हजार रुपयांपर्यंतच इंधन भरण्याचे आदेश पंप चालकांना दिले आहेत. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात वेणार असून, नागरिकांना खरी परिस्थिती समजून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासन म्हणते, जिल्ह्यात मुबलक साठा

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमीण फुल्लारी यांनी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल्या मुबलक साठा असल्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंचन टंचाईचायत अफवा पसरविल्या जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच सर्वांना समान प्रमाणात इंथन मिळावे यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे योग्य नियोजन फेले आहे. सर्व वाहनांना इंचन मिळावे याप्ताठी दुचाकी वाहनांना २०० रपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांना २००० रुपयांपर्यंत इंथन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या उष्टीने इंचन साठवणूक धोकादायक ठरू शकते, त्यामुळे कॅन किंल्या बाटल्यांमध्ये इंधन न चेता थेट वाहनांमध्येच इंधन भान देण्याचे निदेश दिले आहेत, असे फुलारी यांनी सांगितले.

दुचाकी ढकलत नेण्याची वेळ

शहरात गुरुवारी सकाळी दहा ते बारा पंपांवर पेट्रोल-डिझेल उपलब्ध होते. उर्वरित पंपांवर साता उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले होते. पेट्रोल-डिझेलच्या शोबात अनेक वाहनचालक पंपावर जात होते, तिथे नो स्टॉकचा बोर्ड लागल्याने नंतर दुसरया पंपाच्या शोचात हे वाहन चारक पात्राचाव करत होते. त्यातच काही जणांची पेट्रोल संपल्याने अनेकांपर दुचाकी ङकालत नेण्याची वेळ बाली,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT