ॲपे रिक्षाला दुचाकीची धडक, चिमुकल्याचा मृत्यू pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Accident : ॲपे रिक्षाला दुचाकीची धडक, चिमुकल्याचा मृत्यू

सिल्लोड : बोरगाव बाजार फाट्याजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ॲपे रिक्षाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बारा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.9) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील बोरगाव बाजार फाट्याजवळ घडला. सरताज शाह राजू शाह (12, रा. बरकतपूर, ता. कन्नड, ह. मु. मोगळपुरा, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे.

राजू शाह मृत मुलासह बरकतपूरकडून (ता. कन्नड) सिल्लोडकडे परत येत होते. त्यांच्या ॲपे रिक्षाला ( (एमएच- 20, बी- 3759) बोरगाव बाजार फाट्याजवळ दुचाकी (एमएच- 20, एव्ही- 0292) धडकली. यात रिक्षात समोर बसलेला मृत सरताज शाह खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत जखमी बाप-लेकाला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून सरताज शाहला मृत घोषित केले.

या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बीट जमादार विष्णू कोल्हे करीत आहेत. दरम्यान, सिल्लोड- कन्नड रस्ता चकाचक झाल्याने वाहने सुसाट धावतात. सुरुवातीला रस्त्यावर गतिरोधक नव्हते. यामुळे रस्त्यावर दररोज अपघातांच्या घटना घडत होत्या. मात्र आता ठिकठिकाणी गतिरोधक बसवल्याने अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. तरीही वाहन चालकांच्या चुकीमुळे अधून- मधून अपघात घडतच आहेत.अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, याकडे पालक जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारच्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT